पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरूवात होतेय. पण सुरू होण्यापूर्वीच ही योजना वादात अडकलीय. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. कामाची निविदाही निघालीय. पण महापालिकेच्या निविदेत आणि प्राधिकरणाच्या निविदेत जवळपास ९०० ते हजार रुपयांची तफावत आहे.
चऱ्होली, बोऱ्हाडे वाडी, डुडुळगाव, रावेत आणि आकुर्डी मध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जवळपास साडे चार हजार घरे बांधली जाणार आहेत. एकाच शहरात दोन वेगवेगळ्या स्वायत्त संस्थानी काढलेल्या निविदा प्रक्रियेत हा फरक कसा असा सवाल करत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते, ते ऐन वेळी रद्द केल्याने तर विरोधक आणखी आक्रमक झालेत.