सांगलीत पोलीस निरीक्षकांची गोळी घालून केली आत्महत्या

सीआयडी क्राईमचे पोलीस निरीक्षक सखाहरी गिरजाप्पा गडदे यांनी स्वत: च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने  डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलीय. 

Updated: Oct 19, 2017, 01:00 PM IST
सांगलीत पोलीस निरीक्षकांची  गोळी घालून केली आत्महत्या title=

सांगली : सीआयडी क्राईमचे पोलीस निरीक्षक सखाहरी गिरजाप्पा गडदे यांनी स्वत: च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने  डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलीय. 

धक्कादायक बाब म्हणजे प्रमोशन झालं नाही म्हणून आणि मानसिक तणावातून ही आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केलेय. विश्रामबागमधल्या राहत्या घरी गडदे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. 

गडदे हे सांगली सीआयडी क्राईमला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गडदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्टी लिहून ठेवली आहे. *त्यात मला नोकरीत प्रमोशन मिळालं नाही, माझ्या  नंतरच्या लोकांना प्रमोशन मिळालं. मी माझ्या घरच्यांसाठी काही करू शकलो नाही, असा मजकूर लिहला आहे.