Diwali Holidays : दिवाळीच्या तोंडावर फिरायला जाताय? खिसा सांभाळा; पाहा कुठे वाढणार खर्च...

Diwali 2022: दिवाळीची सुट्टी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच आता घराघरांमध्ये, मित्रांच्या ग्रुप्समध्ये कुठेतरी फिरायला जाऊया असे सूर आळवले जात आहेत. पण, त्याआधी ही बातमी वाचा.... 

Updated: Oct 15, 2022, 10:01 AM IST
Diwali Holidays : दिवाळीच्या तोंडावर फिरायला जाताय? खिसा सांभाळा; पाहा कुठे वाढणार खर्च...  title=
private tourist transport price hike amid diwali 2022

Diwali 2022 : महागाईचा भस्मासूर आता प्रवासाच्या सुखसोयींपर्यंतही पोहोचला आहे. दिवाळीत अनेक गोष्टींचे दर वाढणार असून, त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशावर याचे परिणाम होणार असंच सांगण्यात येत होतं. त्यातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. तिथे (ST) एसटीची हंगामी भाडेवाढ होणार असतानाच आता प्रवासाच्या दुसऱ्या वाटांवर जाण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) कंपन्या मोठ्या प्रमाणात लुटमार करत असल्यामुळं दिवाळीत खर्चाची आणखी एक फोडणी तुम्हाला सोसावी लागणार आहे. (Diwali 2022) दिवाळीमुळे खासगी ट्रॅव्हल्सनं प्रवासी भाड्यात दुप्पट, तिप्पट वाढ केली आहे. दिवाळी निमित्त एसटी आणि रेल्वेचं बुकिंग हाऊसफुल्ल झालं आहे. परिणामी अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी अनेकजण खासगी बस, किंवा तत्सम सोयींचा पर्याय निवडू लागले आहेत. 

अधिक वाचा : Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप

नागरीक खासगी ट्रॅव्हल्सकडे वळू लागलेले असचानाच याचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सनं मनमानी करण्यास सुरुवात केली आहे. या लुटमारीकडे पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन ते तिन दिवसांपासून अचानकपणे ही दरवाढ करण्यात आलीये. त्यामुळे प्रवासासाठी नागरिकांचे हजारो रुपये खर्च होत आहेत... 

प्रवासी भाडं नेमकं किती फरकानं वाढलंय पाहा...

शहर आठवड्यापूर्वीचे दर   नवे दर 
पुणे- नागपूर  1700- 2000  4500-5000
पुणे- अमरावती   1500-1800   3600- 4500
पुणे-लातूर  800-1000  1700-1900
पुणे- नांदेड  800-1000  2100-2699
पुणे-जळगाव  700-900  2100-2600
पुणे-औरंगाबाद  600-900  1500-2000