पुणे : पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये आज प्रचंड गदारोळ झाला. शिवसेनेच्या गटनेत्यानं महापौरांचा राजदंड पळवला. त्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी तो परत आणला.
सायकल शेअरींग योजनेवरून हा गोंधळ झाला. या गदारोळातच सायकल शेअरींग योजना मंजूर करण्यात आली. तत्पूर्वी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आज सायकल चालवत पुणे महापालिकेत पोहोचले. शनिवारवाड्यापासून महापालिका इमारतीपर्यंत त्यांनी सायकल चालवत प्रवास केला.