मुंबई : सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश शासनाने दिले असताना ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र निर्देशांची पायमल्ली केलेली दिसून येत आहे. पुण्यातील एका शाळेच्या उद्घाटनाला छगन भुजबळांनी उपस्थिती दाखवली. राज्यातील कोरेनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पुण्यात आहे. पुण्यात कोरोनाचे दहा रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभुमीवर या कार्यक्रमाला प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी कशी दिली ? याबद्दल विचारणा होत आहे.
बंदचे आवाहन न पाळणारे सिनेमागृह, खासगी क्लासेसवर कठोर कारवाई होईल अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज रोरो सेवेच्या उद्घाटनाला जाणे टाळले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदारीने वागत असताना मंत्रीमंडाळातील ज्येष्ठ मंत्री असे वागत असल्याने लोकांमध्ये वेगळा संदेश देणारे आहे. यामुळे भुजबळांच्या भुमिकेवर प्रश्न उभे राहत आहे.
सरकारच्या आदेशाची प्रशासनाकडूनच पायमल्ली झालीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही शासकीय कार्यक्रम घेऊ नका, असे आदेश असताना अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनात घेण्यात आले आहे. यात हजारो कर्मचाऱ्यांची इथे गर्दी झाली होती.