तू माझ्याशी लग्न का नाही करत? एकतर्फी प्रेमातून आरोपीचा तरुणीवर चाकूने हल्ला

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, पुणे जिल्हा हादरला

Updated: Jul 5, 2022, 08:00 PM IST
तू माझ्याशी लग्न का नाही करत? एकतर्फी प्रेमातून आरोपीचा तरुणीवर चाकूने हल्ला title=

पुणे : एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांमध्ये अनेकवेळा आरोपींना कठोर शिक्षाही होते. पण अशा घटना घडण्याचं प्रमाण मात्र काही कमी होत नाही. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या मळद परिसरात घडली आहे. 

लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका सतरा वर्षीय मुलीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुरकुंभनजीक पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी 27 वर्षांच्या राहुल श्रीशैल निरजे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

राहुल निरजे या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्या मुलीशी त्याला लग्न करायचं होतं, पण मुलीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे राहुल संतप्त झाला होता. या संतापातूनच राहुलने संधी मिळताच त्या मुलीला शेतात गाठलं आणि तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला दौंड इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

याप्रकरणी राहुल निरजे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.