मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Shocking News in Pune : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय.. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय.. दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय..  

Updated: Aug 16, 2024, 10:08 PM IST
मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार title=
प्रातिनिधिक फोटो

Shocking News in Pune : पुण्यातील हडपसर इथल्या एका नामांकित शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतापामुळे एकच खळबळ उडालीय.  विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या वर्गातील मैत्रिणींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दहावीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मैत्रिणींचे फोटो टेलिग्राम या ॲपवर अपलोड करून त्याला न्यूड फोटोमध्ये (Nude photos) मॉर्फ (Morph) केले. या दोन विद्यार्थ्यांनी मॉर्फ केलेले फोटो शाळा सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राला पाठवले. शाळेतील एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 16 जून ते 30 जून दरम्यान पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागातील असलेल्या एका नामांकित शाळेत घडला. पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले 2 विद्यार्थी हे इयत्ता दहावीमध्ये शिकत असून एकाच वर्गात आहेत. तर ताब्यात घेतलेला तिसरा मुलगा हा शाळा सोडून गेला असला तरी शाळेतील मित्रांच्या संपर्कात होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांना बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं.

या प्रकारानंतर 3 पैकी एका पिडीत विद्यार्थिनीच्या आईनं सदर विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली.. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकारातून मुलांकडून इंटरनेटचा आणि मोबाईलचा कसा दुरुपयोग केला जातो हे अधोरेखित होतंय. मुलांच वय अल्लड असतं. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत चाइल्डलाईनकडून व्यक्त करण्यात आलंय..

हडपसर मधील या धक्कादायक प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांवर पालकांनी लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आपली मुलं मोबाईलवर काय पाहातात, कोणते गेम खेळतात, कोणाशी बोलतात? या बारीक सारीक गोष्टीवर पालकांचं लक्ष असायला हवं. 

मोबाईलचा दुष्परिणाम
सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळते. उठता, बसता, जेवताना देखील मुलांना मोबाईल हातात लागतो, त्यातल्या त्यात किशोरवयीनांमध्ये मोबाईल गेम खेळाची क्रेझ आहे. मोबाईलचा हा मुलांकडून होणारा अतिवापर पालकांसाठी मोठी डोकेदुखी (Headache) ठरत असून, खेळ आणि अभ्यासात दुर्लक्ष, विविध आजार, सायबर गुन्हेगारी अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.