पालघरमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत रॅगिंग

 पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत

Updated: Nov 16, 2019, 11:11 AM IST
पालघरमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत रॅगिंग title=

पालघर : पालघर शहरातील एम .एल .ढवळे ट्रस्टच्या रूग्णालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानसिक छळ केल्याप्रकरणी रुग्णालयाच्या १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात रॅगिंग प्रतिबंध कायदाअन्वये कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

तक्रार करणारी प्रशिक्षणार्थी डॉक्टर आपले शिक्षण पूर्ण करून याच आठवड्यात ढवळे रुग्णालयात प्रशिक्षण अनुभव घेण्यासाठी रुजू झाली होती. यावेळी वरिष्ठ डॉक्टर्सनी तिच्यासोबत गुरुवारी रात्री छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. यामुळे तिला मानसिक त्रास होत असून या विरोधात तिने पंधरा वरिष्ठ डॉक्टर विरोधात पालघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.