राष्ट्रसंत शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूनंतरही वादाची मालिका सुरूच

 शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूनंतरही आरोप प्रत्यारोप सुरूच

Updated: Sep 6, 2020, 10:57 AM IST
राष्ट्रसंत शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूनंतरही वादाची मालिका सुरूच title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : लातूर जिल्ह्याचा अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूनंतरही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. निधनापूर्वी महाराजांचा ट्रस्टच्या काही मंडळींनी छळ केल्याचा गंभीर आरोप अ.भा. शिवा संघटनेच्या मनोहर धोंडे यांनी केलाय. तर  लातूरच्या शिवा लिंगायत संघटनेनेही महाराजांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी महाराजांनी नेमलेले अहमदपूर आणि हडोळती मठावर नेमलेले उत्तराधिकारी मान्य नसल्याचे म्हटलंय.

महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मोठा भक्त वर्ग असलेल्या लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे ०१ सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या १०४ व्या वर्षी महाराजांचे कोरोनामुळे निधन झालं. मात्र त्यानंतरही मठ, उत्तराधिकारी, निधनापूर्वीची समाधीची अफवा आणि महाराजांच्या निधनाची चर्चा काही केल्या कमी होत नाही. 

२८ ऑगस्ट रोजी महाराज समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने अहमदपूरच्या भक्ती स्थळावर हजारो अनुयायांनी गर्दी केली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. पुढे महाराजांना नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलं. तिथे त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. मात्र निधनापूर्वीही नांदेडमध्ये रुग्णालयात येऊन भक्तीस्थळाच्या ट्रस्टींनी महाराजांचा अतोनात छळ केल्याचा आरोप अ.भा. शिवा वीरशैव लिंगायत संघटनेच्या मनोहर धोंडे यांनी केलाय. तर धोंडे यांची वाद निर्माण करण्याची पार्श्वभूमी समाजाला माहित असल्यामुळे 'समाधी' अफवे मागे तेच असल्यामुळे त्यांच्या चौकशीची मागणी ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली आहे. 

४ सदस्यांचे बहुमत करून ट्रस्टचे अधिकार घेण्यासाठी षडयंत्र. अप्पाना ०७ पैकी ०३ सदस्य बदलायचे. जिवंत समाधी घेऊन भावनिक ब्लॅकमेल करायचे आहे. अप्पाना ट्रस्टमधील लोकांनी भावनिक त्रास दिलाय. मी याचा छडा लावणार. रामदास पाटील सारख्याना चॉकलेट देऊन माझ्यावर भुंकण्यासाठी सोडलंय. हॉस्पिटलमध्ये ही त्यांना टॉर्चर केलंय. एका तासाच्या भेटीत ही टॉर्चर केलंय. ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत. त्या ६ जणांनी छळ केल्याचे  शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी सांगितले. 

मनोहर धोंडेची पार्श्वभूमीवर धर्म, समाज तोडण्यात बऱ्याचशा मठात वाद निर्माण करण्यात ते माहीर आहेत. इथं शिष्य म्हणून यावं. मी यात पाठपुरावा करेन. सायबर क्राईममधून डिटेल्स घ्याव्यात. यांनीच तिथे गोंधळ घातला. सत्य बाहेर येईल. या अनुषंगाने दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी इन कॅमेरा जबाब ही घेतलाय. अप्पानी कधीच समाधी घ्यायचं म्हटलं नाही. २८ तारखेला याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांचा गोंधळ आहे त्याचा तपास करावा. पर्यटन, हॉस्पिटल, गुरुकुल, गोशाळा, अनाथ आश्रम-वृद्धाश्रम, उत्तराधिकारी यांना सोबत घेऊनच करेन. अप्पांची ५० कोटींची प्रॉपर्टी म्हणणेही चुकीचे आहे. अप्पांची अवहेलना करतील त्यांना शिक्षा मिळेलच असे अहमदपूर भक्ती स्थळ ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी सांगितले.
 
तर लातूरच्या शिवा लिंगायत युवक संघटनेच्या मनोहर पाटील यांनी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूच्या सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच महाराजांनी नेमलेल्या अहमदपूर आणि हडोळती मठावरील उत्तराधिकाऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. जर घरातील उत्तराधिकारीच नेमायचा होता तर महाराजांनी १०४ वर्षे वाट बघितली नसती. त्यामुळे आम्हाला उत्तराधिकारी मान्य नसल्याचे म्हटले आहे. तर उत्तराधिकारी नेमायचा अधिकारी हा महाराजांचाच असल्यामुळे त्या विषयाला फुल स्टॉप असल्याचे नांदेडच्या मनोहर धोंडे यांचे म्हणणे आहे. 

व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तर महाराजांकडून वदवून घेण्यात आलं. महाराजांना शिकलेला, बुद्धिमत्ता, तत्व आणि वैचारिक शिवाचार्य अपेक्षित होत. जर महाराजांना घरच्या लोकांनाच बसवायचं होत तर १०४ वर्षे वाट बघितली नसती. मृत्यूपूर्वी जबरदस्तीने वदवून घेतलं त्यांना ते लायकीचे वाटत नव्हते. मानसिक खच्चीकरण करून आताचे उत्तराधिकारी वदवून घेतलं. ते आम्हाला मान्य नाहीत. अहमदपूर आणि हडोळती मठावर दोन उत्तराधिकारी आहेत त्यांचे विधी पूर्ण नाहीत त्यामुळे ते आम्हाला मान्य नाहीत. 

जिवंत समाधीचे षडयंत्र मी हाणून पाडलाय. उत्तराधिकारी नेमण्याचा मान धर्म परंपरेनुसार आहे. हा पुत्रवर्गीय मठ असल्यामुळे कुटुंबाचा नेमायचा असून त्यांनी घोषित केलाय म्हणजे फुल स्टॉप. रामदास पाटील कोण ओळखत नाही. ते अध्यक्ष म्हणून घेतात ते साधे सदस्य ही नाहीत असे  शिवा लिंगायत युवक संघटना अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी म्हटलंय.

वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झालेले राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे स्वतः एमबीबीएस डॉक्टर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आताच्या पाकिस्तानमधील लाहौर येथून त्यांनी आपली एमबीबीएसची पदवी मिळवली होती. पुढे अविवाहित राहून त्यांनी पूर्णवेळ समाजासाठी वाहून घेतलं. आता त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर निर्माण झालेल्या वादामुळे त्यांच्या भक्तांमध्ये नाराजीचाच सुर दिसून येत आहे.