धावपटू कविता राऊत 'या' पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

नाशिकची धावपटू सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत आता विधानसभेच्या राजकीय धावपट्टीवर धावण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 26, 2019, 11:39 AM IST
धावपटू कविता राऊत 'या' पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरणार? title=

नाशिक : नाशिकची धावपटू सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत आता विधानसभेच्या राजकीय धावपट्टीवर धावण्याची शक्यता आहे. आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे इगतपुरी विधानसभा या आदिवासी राखीव मतदारसंघासाठी कविता यांना उमेदवारी देण्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

धावपटू कविता राऊत यांना उमेदवारी देऊन शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार निर्मला गावित यांना शह देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. निर्मला गावित यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.  

या पार्श्वभूमीवर शिवसेनेना, भाजप आणि इतर सर्व पक्षातील सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे एक उमेदवार देण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही इगतपुरी त्र्यंबकेश्वर या मतदारसंघासाठी चुरशीची ठरणार आहे. याबाबत कविता राऊत हिने अजून पुष्टी दिली नसली तरी, तिच्या कुटुंबाला समजावण्याचे प्रयत्न आघाडीकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत.