चिमुकल्याला घेऊन कालव्याच्या भिंतीवर बसला; वाशिममध्ये तरुणाची जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी

एके काळी पाणीप्रश्न असणाऱ्या वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे आता वाशिमचा पाणीपुवठ्याचा प्रश्न सुटला आहे. तरी काही नागरिक आणि पर्यटन जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करताना दिसत आहेत. 

Updated: Sep 5, 2024, 01:53 PM IST
चिमुकल्याला घेऊन कालव्याच्या भिंतीवर बसला; वाशिममध्ये तरुणाची जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी title=

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून एकबुर्जी प्रकल्पाच्या धबधब्यावर पर्यटक गर्दी करत आहेत. काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक अशी स्टंटबाजी करत आहे. जिल्ह्यातील शेलुबाजारच्या अडाण नदी पात्रात स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, अशा परिस्थितीत एकबुर्जी प्रकल्पात एक व्यक्ती लहान मुलाला घेऊन चक्क कालव्याच्या भिंतीवर बसल्याचे पाहायला मिळाले आहे. खाली वाहत्या पाण्याच्या लाटा दिसत असतानाही चिमुकल्याला घेऊन अशा धोकादायक ठिकाणी ती व्यक्ती बसली आहे. नदी-नाले आणि जल प्रकल्पावर स्टंटबाजी करू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले असले तरी नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन एकबुर्जी प्रकल्पावार स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पाची पाणी साठवण्याची क्षमता 11.97 दशलक्ष घनमीटर आहे. एके काळी पाणीप्रश्न असणाऱ्या वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प आता ही पातळी ओलांडून ओसंडून वाहतो आहे. यामुळे वाशिमचा पाणीपुवठ्याचा प्रश्न सुटला आहे. प्रर्यटक मात्र यासगळ्याचा आनंद लुटत धबधब्यावर गर्दी करत आहेत. त्यातील काही अतिउत्साही पर्यटक स्टंटबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात येत आहेत. 

हेही वाचा: आता हॉटेलमध्ये जाताना खरे आधारकार्ड दाखवायची गरज नाही ! नक्की काय आहे ही सुविधा एकदा बघाच

एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात शेलुबाजारातील सागर अरूण प्रधान या 30 वर्षीय तरुणाने ओसंडून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पाण्यात स्टंटबाजी करत उडी मारली आणि हे त्याला चांगलेच महागात पडले आहे. हा तरून पाण्यात वाहून गेल्याने दोन दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक त्याचा शोध घेत होते. शेवटी काल त्याचा मृतदेह सापडला. नदी- नाल्याला पूर आलेला असताना अशा प्रकारची स्टंटबाजी करणे  जीवावर बेतू शकते. त्यामुळे कोणीही अशी स्टंटबाजी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मागच्या महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडून दोन महीने झाले असतानाही एकबुर्जी प्रकल्पातील पाण्याचा साठा मात्र 35 टक्क्यांवरच होता. त्यात फारशी वाढ झालेला नव्हती. काही वर्षांपूर्वी तर याच एकबुर्जी धरणातून वाशिमकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाशिमधील लोक काळजीत होते. पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी या धरणाची उंची वाढवा अशी मागणीही नागरिकांकडून तेव्हा करण्यात आली होती. पण दोन वर्षांनंतर आता हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांसह पर्यटकही आनंदात आहेत.

वाशिमचा एकबुर्जी प्रकल्प पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आसपासच्या परिसराचा विकास केला आहे. लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहे. दर वर्षी या प्रकल्पावर दुर्मिळ असणाऱ्या प्लेंमिंगोसह इतर 170 प्रकारचे विदेशी पक्षी नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांच्या दरम्यान येत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हे एक आकर्षणाचे ठिकाण आहे.