मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता शाळांचीच

प्रत्येक शाळेत आता तीन वेळा हजेरी

Updated: Sep 11, 2018, 03:25 PM IST
मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता शाळांचीच

मुंबई : राज्यातल्या शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता शाळांचीच असणार आहे. त्यासाठी राज्यात आजपासून प्रत्येक शाळेत तीन वेळा हजेरी घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या मुली आणि महिलांच्या सुरक्षितेतेच्या मु्द्द्यावरून सातत्यानं टीकेची झोड उठत आहे. राज्यात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. त्याविरोधात सरकारनं रक्षा अभियान हाती घेतलं आहे.

मंगळवारपासून राज्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार असून प्रत्येक वर्गात रोज तीनदा हजेरी घेण्यात येत आहे. हा नियम सर्व जिल्हा परिषद, अनुदानित, आणि विनाअनुदानित शाळांमध्ये लागू करण्यात आलं आहे.