दहावीत 90 टक्क्यांहुन अधिक गुण मिळवणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी मिळू शकणार आहे. 

Updated: Jun 21, 2019, 09:35 PM IST
दहावीत 90 टक्क्यांहुन अधिक गुण मिळवणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी title=

मुंबई : यंदाही दहावीचा निकाल चांगला लागलाय. दरवेळेप्रमाणे यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. 90 टक्क्यांहुन जास्त गुण मिळणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करत मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे.  दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण असलेले आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी मिळू शकणार आहे. 

दक्षिण मुंबईतील 'सायन्स ब्रीज ॲकेडमी' या प्रतिष्ठीत क्लासेसतर्फे सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लालबाग येथील गणेशगल्ली आणि परळ येथील गुरु राणी चौक येथे या क्लासेसच्या शाखा आहेत. दहावीनंतर ज्यांना सायन्स फिल्डमध्ये जायचे आहे आणि हालाखीच्या परिस्थितीमुळे क्लासेसची फी परवडत नसेल अशा निवडक गरजू विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम असल्याचे क्लासचे प्रोफेसर वैभव पोंगडे सांगतात.

तुम्ही 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले, आर्थिक परिस्थिती हालाखीची आणि विज्ञान शाखेत करिअर करण्यारे विद्यार्थी असाल तर या ठिकाणी संपर्क साधू शकता. इच्छुकांनी 9664565389 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.