निष्ठूर पोलीस बापाकडून पोटच्या मुलांना जबर मारहाण

पोलिसांनी केली मुलांची सुटका 

Updated: Jan 17, 2021, 10:46 AM IST
निष्ठूर पोलीस बापाकडून पोटच्या मुलांना जबर मारहाण

इगतपुरी : बाप हा कायमच मुलांच्या सुरक्षेचा विचार करत असतो. आपली मुलं कशी सुरक्षित राहतील यासाठी तो प्रयत्नशील असतो. पण याला अपवाद ठरली आहे इगतपुरीची घटना. इगतपुरीत एका बापाने आपल्या पोटच्या मुलांना जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बापाने मुलीला चटके देवून आणि मुलाला लाकडाने मारहाण केली आहे. 

पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांचा निष्ठूर बाप प्रचंड छळ करत असल्याची घटना उघड झाली आहे. इगतपुरीतला हा प्रकार उघड झाला आहे. राहुल विजय मोरे या निष्ठूर बापाने आपल्या पाच आणि आठ वर्षांच्या मुलांना प्रचंड मारहाण केली आहे. पाच वर्षांच्या प्रियांशू या मुलीच्या हाताला चटके दिले तर आठ वर्षांच्या हिमांशू या मुलाला लाकडाने मारहाण केली आहे. 

राहुल मोरे हा रेल्वे पोलिसात नोकरीला आहे. या मुलांची आई हयात नाही. आई गेल्यावर ही मुलं त्यांच्या आजीकडे राहायला गेली. पण गेल्या दोन महिन्यांपासून ही मुलं बापाकडे राहायला गेल्यावर या मुलांचे बाप आणि सावत्र आईने प्रचंड हाल सुरू केले. या दोन मुलांचा होणारा शारीरिक छळ शेजारच्यांच्या लक्षात आल्याने चिडलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.

इगतपुरी पोलिसांनी या दोन्ही मुलांची सुटका केली आहे. या दोघांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मावशी आणि मावस आजी या दोन्ही मुलांची काळजी घेत आहे. 

पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलांना मारहाण, सावत्र आई, बापाकडून मुलांना चटके, मारहाण, इगतपुरीतील प्रकार शेजारच्यांच्या तक्रारीनंतर उघड...रेल्वेत पोलिस असल्याला बापाविरोधात कडक करवाई करण्याची मागणी