शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणा-या छिंदमला अटक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अखेर अटक करण्यात आली आहे. 

Updated: Feb 16, 2018, 10:52 PM IST
शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणा-या छिंदमला अटक title=

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अखेर अटक करण्यात आली आहे. 

अंधारात लपला असताना अटक

श्रीपाद छिंदम कारमधून जात असताना, नागरिकांनी पाठलाग केला. त्यानंतर कारमधून पळून छिंदम सोलापूर रोड परिसरातील शिराडोण शिवारातील अंधारात लपला. त्यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं छिंदमला अटक केली.

काय आहे प्रकरण?

शिवजयंतीच्या तोंडावरच महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर श्रीपाद छिंदम याला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपमधून बडतर्फ करण्यात आले. तसेच त्याची उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी यासंदर्भात पत्रक काढून घोषणा केली.

हे पण वाचा : VIDEO : शिवाजी महाराजांबद्दल श्रीकांत छिंदम यांनी नेमकं म्हटलं काय, पाहा...

पडसाद

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत मोर्चा काढला. खासदार दिलीप गांधींच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्याही कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.