दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलला

31 मार्चला जाहीर होणार पेपरची तारीख

Updated: Mar 21, 2020, 02:42 PM IST
दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलला  title=

मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. या पेपरची तारीख ही ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी भूगोल-अर्थशास्त्राचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

कोरोनामुळे याधीच 1 ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पण आता दहावीचा हा पेपर ही पुढे ढकलण्यात आला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. पण तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून तो लांब नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं याआधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. आज 11 नवीन रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 63 रुग्ण आढळून आले आहेत.