मुंबई : राज्यात कोरोनाची पु्न्हा दुसरी लाट आल्याने दहावी बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. परंतु राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देत अनेक प्रश्नांचा पुर्णविराम दिला आहे.
इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या दरम्यान होणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल व 21 मे 2021 या दरम्यान होणार आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाल्याने दोन्ही वर्गाच्या लेखी परीक्षांसाठी अधिकचा 30 मिनिटे वेळ देण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाचा विचार करता, विद्यार्थी शिकत असलेल्याच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षाकेंद्र असणार आहे. विशिष्ठ परिस्थितीमध्ये वर्ग कमी पडल्यास जवळच्या उपकेंद्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल.
प्रात्याक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे.