दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. २०१८ नंतर कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येत नव्हते. आता राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येणार आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
शेतकर्यांकडे ४० हजार कोटीची थकबाकी आहे. त्या पार्श्वभुमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. तसेच मागील पाच वर्षातील डिले चार्जेस रद्द केले जाणार आहेत. थकबाकीची रक्कम शेतकर्यांनी भरली तर ५० टक्के वीज बिल माफी मिळणार आहे
दरवर्षी लाखभर शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी अर्ज करतात. २ लाखांच्या वर कृषी कनेक्शन द्यायचे आहेत ते दिले जातील असेही ते म्हणाले.
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्यांना ५० टक्के वीज बिल माफी मिळणार आहे. कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याचे उर्जामंत्री म्हणाले.