बेकायदेशीर बंगला प्रकरण घेणार सहकारमंत्र्यांची विकेट?

आपण दोषी ठरलो तर, बंगलाही पाडून टाकू. त्यात येवढे काय! असेही देशमूख म्हणाले.

Updated: Jun 2, 2018, 02:37 PM IST
बेकायदेशीर बंगला प्रकरण घेणार सहकारमंत्र्यांची विकेट? title=

मुंबई: आरक्षीत जागवेर बंगला बांधल्याबाबतच्या प्रकरणाचा पालिका आयुक्तांनी दिलेला अहवाल विरोधात गेल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात देशमुख जोरदार अडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, देशमुख यांनी या प्रकरणावरून झी चोवीस तासशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, ही भूमिका स्पष्ट करताना देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचे संकेतही दिले. बेकायदेशीर बंगला प्रकरणावरून सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक आहेत, असा प्रश्न देशमुख यांना विचारण्यात आला होता. दरम्यान, या प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांचे काय माझ्या पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास मी पदाचा काही सेकंदात राजीनामा देईल, असे देशमुख यांनी सांगितले. तसेच, आपण प्रामाणिक कष्ट केले आहे. पण, त्यात जर आपण दोषी ठरलो तर, बंगलाही पाडून टाकू. त्यात येवढे काय! असेही देशमूख म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

सोलापूरच्या होटगी रोडवर देशमुख यांचा नवा बंगला

२ एकरांपैकी २२ गुंठ्यावर सुभाष देशमुख यांनी बांधकाम केलं

अग्निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुख यांनी बंगला उभारला

आरक्षण उठलेलं नसतानाही देशमुख यांनी या ठिकाणी टोलेजंग बंगला उभारला

देशमुख यांच्या बंगल्याचे बांधकाम २०१२ सालचे 

गुंठेवारी कायद्याखाली २००१ पर्यंतचीच बांधकामे अधिकृत केली जातात

बंगल्याच्या बांधकामास परवानगी दिल्याप्रकरणी पालिकेवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची याचिका 

न्यायालयाकडून पालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश 

कोणतीही कार्यवाही न झाल्यानं पुन्हा अवमान याचिका दाखल

गुंठेवारी कायद्याअंतर्गत हे बांधकाम अधिकृत करता येणार नसल्याचा पालिकेचा न्यायालयात अहवाल

बेकायदेशीर बंगला प्रकरण घेणार सहकारमंत्र्यांची विकेट | Subhash Deshmukh likely to resign soon