गेल्या सहा महिन्यात नवा कर वाढविला नाही - मुनगंटीवार

सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाणारे इंधन दर कमी होतील का याकडे नागरिक डोळे लावून बसलेत. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याने कोणताही नवा कर गेल्या सहा महिन्यात वाढविला नसल्याने दरवाढीचे खापर त्यांनी आंतरराष्ट्रीय तेल दराच्या कमी अधिक किंमतीवर फोडलंय. 

Updated: Sep 16, 2017, 09:03 AM IST
गेल्या सहा महिन्यात नवा कर वाढविला नाही - मुनगंटीवार title=

चंद्रपूर : सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाणारे इंधन दर कमी होतील का याकडे नागरिक डोळे लावून बसलेत. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याने कोणताही नवा कर गेल्या सहा महिन्यात वाढविला नसल्याने दरवाढीचे खापर त्यांनी आंतरराष्ट्रीय तेल दराच्या कमी अधिक किंमतीवर फोडलंय. 

पेट्रोल दराबाबत महाराष्ट्र अग्रणी आहे मात्र डिझेल बाबतीत राज्य नवव्या क्रमांकावर असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. शेती, सिंचन, वीज यावर मोठा खर्च अपेक्षित आहे. 

राज्यातल्या शेतक-यांना कर्जमुक्ती द्यायचीय. 2011च्या तुलनेत कृषी क्षेत्रावर विक्रमी 62 हजार कोटींचा खर्च होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला इंधन दरवाढीपासून दिलासा नसल्याचं स्पष्ट केलंय.