साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या खबरदारी

पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असते. साथीच्या आजारांपासून कशी खबरदारी घ्याल? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 1, 2024, 03:51 PM IST
 साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या खबरदारी title=

Mumbai : पावसाळ्यात दरवर्षी साथींच्या आजाराचा धोका निर्माण होत असतो. यामुळे पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणं थोडं अधिक गरजेचं होते. त्यामध्ये पावसाळ्यात संसर्गजन्य आजार सर्वात जास्त पसरतात. जर तुमची शारीरिक प्रकृती नाजूक किंवा कमकुवत असेल तर हे आजार झपाटयाने होतात. त्यामुळे गंभीर आजार होऊ नये यासाठी आपण कशी काळजी घ्यावी जाणून  घ्या सविस्तर. 

पाणी उकळून प्या

आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी नियमित उकळून प्यायल्याने तुम्हाला कोणतेच संसर्गजन्य आजार होणार नाही. पाणी उकळून प्यायल्याने त्यात असलेले जीवजंतू देखील मरतात.

स्वच्छता ठेवा

पावसाळ्यात तुम्ही बाहेरून आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करा किंवा हात पाय स्वच्छ धुवून घ्या. तुमच्या हात पायावर चिखल घाण साचल्याने रोगांना आमंत्रण मिळत.

परिसर स्वच्छ ठेवा

पावसाळ्यात घरासमोरील परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे दररोज तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पावसाळ्यात कुठेही पाणी साचलेले असेल तर लगेच स्वच्छ करा. कारण एका ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डास होऊ शकतात. ज्यामुळे पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढते.

ताजी फळ भाज्या खा

संसर्गजन्य रोग होऊ नये यासाठी ताजी फळ, भाज्यांचं सेवन आहारात करा. मार्केटमधून आणलेला भाजीपाला किंवा फळे घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतरच खा.

बाहेरचे पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात शक्यतो उघडयावरचे पदार्थ खाणे टाळा. यामध्ये चायनीज भेळ किंवा पाणी पुरी हे सर्व पदार्थ कितीही आवडत असलं तरी हे पावसाळ्यच्या दरम्यान खाणे टाळा. जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहावे. 

डॉक्टरांची मदत घ्या

पावसाळ्यात तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसल्यास तुम्ही थेट डॉक्टरकडे जाऊन तपासणी करुन घ्या. डॉक्टरांची मदत घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.