लष्कर हे पुरुषांची मक्तदारी असलेलं क्षेत्र मानल जात. मात्र या क्षेत्रात आता महिलाही दिसू लागल्या आहेत. लष्करात महिलांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी देण्याचा निर्णय डिफेन्स मंत्रालयाने घेतला. या नंतर सैन्यात महिला सुद्धा दिसू लागल्या.
या निर्णयानंतर शाहिद संतोष महाडिक यांच्या पत्नीने परीक्षा देत सैन्यात नोकरी सुरू केली आहे.
लष्कराच्या पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या आर्मी एव्हिएशन मध्येही महिलांचा समावेश दिसून येत आहे. नाशिक मध्ये बुधवारी (25 मे) 37 वा लढाऊ हेलिकॉप्टर चालवणाऱ्या वैमानिकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. या तुकडीत पहिली महिला हवाई अधिकारी पाहायला मिळाली. त्यांचे नाव आहे अभिलाषा बराक.
कोण आहेत अभिलाषा बराक
अभिलाषा या सध्या भारतीय सैन्य दलात कॅप्टन आहेत. ते मूळचे राहणारे हरियाणा राज्यातील रोहतक जिह्यातील. त्यांचे वडील सैन्यात असल्याने अभिलाषा आणि त्यांचा भाऊ दोघंही सैन्य दलाच्या वातावरणात लहानाचे मोठे झाले. वाडीलांनंतर भाऊ सैन्यात भरती झाला होता.
अभिलाषा बराक ह्या हिमाचल प्रदेश मधील कासूली लॉरेन्स स्कूल सनावरच्या माजी विद्यार्थिनी आहेत. लॉरेन्स स्कूलच शिक्षण पूर्ण करून २०१६ साली त्यांनी दिल्लीच्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. याठिकाणी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक ही पदवी प्राप्त केली.
कधी भरती झल्या सैन्यात
२०१८ साली अभिलाषा बराक चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून भारतीय सैन्य दलात भरती झाल्या. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना हॉर्स रायडिंग आणि ज्युडोमध्ये मेरिट कार्ड मिळाले. अभिलाषा यांची राष्ट्रपतींच्या समोर होणाऱ्या प्रतिष्ठित अशा हवाई सादरीकरणासाठी कमांडर म्हणून निवड झाली. पुढे चालून त्यांनी हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि हवाई कायदा अभ्यासक्रमात ७५.७० टक्के गुण मिळवले आणि पदोन्नती परीक्षाही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या.
यानंतर त्यांनी नाशिकच्या गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल मध्ये प्रशिक्षण घेतले. खडतर प्रशिक्षण करत त्या भारतीय सैन्य दलात पहिल्या महिला हवाई अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत.
बुधवारी झालेल्या कार्यक्रमात आर्मी एव्हिएशन चे महासंचालक आणि कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सूरी यांच्या हस्ते एव्हिएशन विंग तसेच प्रशिक्षणात त्यांच्या कामाबद्दल 'फ्लेडलिंग' ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.