पुणे : महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थीनंतर पीएमपीएलच्या ठेकेदारांचा संप मागे घेण्यात आला असून तातडीने बससेवा पूर्ववत सुरु झालीय.
शुक्रवारी सायंकाळी महापौर, पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे आणि ठेकेदारामध्ये बैठक झाली. यामध्ये ठेकेदारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील असं आश्वासन मुंढे यांनी दिलं. तर महापौरांच्या शिष्टाईनंतर ठेकेदारांनी संप मागे घेतला.
त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि तुकाराम मुंढे यांच्यातल्या संघर्षाला कारणीभूत ठरलेला विद्यार्थी वाहतुक बस दरवाढीच्या मुद्द्यावरही तोडगा काढण्यात आलाय. विद्यार्थी वाहतुकीसाठी 66 रुपये प्रति किलो मीटर दर निश्चित करण्यात आलाय. हा दर 141 रुपये एवढा वाढवण्यात आला होता.
तो कमी करण्यात आल्याने तसंच पीएमपीएलकडून सबसिडी देण्याचं मान्य झाल्याने हा प्रश्न निकाली निघाला. या बैठकीनंतर कुठलेही वाद नसल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.