close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

भोकरदन तालुक्यातील अन्वा परिसरातील घटना

Updated: Jul 20, 2019, 09:05 PM IST
अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यातील अन्वा येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अयान इम्तियाज खान असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा परिसरात ही दुर्देवी घटना घडली. शनिवारी तलावातून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

अन्वा येथील उर्दू शाळेचे काही विद्यार्थी शुक्रवारी शाळेला सुट्टी असल्याने अंघोळीसाठी अन्वा पाडा गावाजवळ असलेल्या तलावावर गेले होते. मात्र अयान खान हा इतर विद्यार्थ्यांसोबत परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. शनिवारी दुसऱ्या दिवशी तलावाबाहेर त्याचे कपडे आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी सकाळी सात वाजल्यापासून तलावात शोधकार्य सुरू केले. अखेर सहा तासानंतर अयान खान याचा मृतदेह तलावात आढळून आला.