काय झाडी, काय डोंगर... पावसाळ्यात ही आहेत फिरण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणं

पावसाळ्यात पर्याटनासाठी जाण्याचा विचार करत असाल कर हे आहेत काही पर्याय.

Updated: Jul 3, 2022, 06:11 PM IST
काय झाडी, काय डोंगर... पावसाळ्यात ही आहेत फिरण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणं title=

मुंबई : मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर आता हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला आहे. पावसाळा सुरु झाला की वेध लागतात ते 

निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचे. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणं आहेत जेथे तुम्ही फिरण्यासाठी जावू शकतात. त्यापैकीच काही 

ठिकाणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. लोणावळा/खंडाळा

सह्याद्रीच्या घाटावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. जंगल, हिरवळ, धबधबे आणि दऱ्या हे येथील प्रमुख आकर्षणं आहेत. जे मनाला भावतात. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी येऊ शकता. राजमाची पॉइंट, वलवण धरण, भुशी डॅम, टायगर्स लीप, ड्यूक्स आणि डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड आणि विसापूर ही प्रमुख ठिकाणे आहेत.

2. माथेरान

रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी हे अगदी जवळचं ठिकाण आहे. अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटनासाठी बेस्ट ऑप्शन आहे. शार्लोट लेक, पॅनोरमा पॉइंट, लुईसा पॉइंट, सनसेट पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट असे अनेक पॉइंट्स येथे पाहण्यासारखे आहेत.

3. ताम्हिणी घाट

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून 140 किमी अंतरावर ताम्हिणी आहे. पावसाळ्यात येथे अनेक जण पर्यटनासाठी खास करुन हजेरी लावतात. निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची आवड असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. हिरव्या दऱ्या, मुळशी धरण, धबधबे तुम्हाला आकर्षित करतात.

4. पाचगणी

पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वरपासून फक्त 20 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. पाचगणी आणि महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येथे अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

5. इगतपुरी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंदिर, कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड, सांदण दरी आणि रंधा धबधबा ही पाहण्याची ठिकाणे आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x