भयंकर ! पनवेलमध्ये खासगी बसवर दरोडा, प्रवाशाला लूटलं, पाहा व्हीडीओ

कळंबोलीत लूटमार झाल्याची घटना घडली आहे. 

Cars | Updated: Nov 28, 2021, 08:05 PM IST
भयंकर ! पनवेलमध्ये खासगी बसवर दरोडा, प्रवाशाला लूटलं, पाहा व्हीडीओ

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : कळंबोलीत लूटमार झाल्याची घटना घडली आहे. कळंबोली इथे आलेल्या खासगी ट्रॅव्हल बसमधून एक जण उतरताच, त्याच्यावर 2 ते 4 चोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. नंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याजवळील बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत काही लाख रुपये रोकड असण्याची शक्यता आहे. कट रचून ही लूट झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान ही व्यक्ती जखमी असून उपचार सुरु आहेत. (Thieves at Kalamboli on Sion Panvel Highway steal a bag full of money from a passenger in a private bus)

नक्की काय झालं?

ही खासगी ट्रॅव्हल बस बीडवरुन आली होती. ही बस सायन पनवेल महामार्गावर कंळबोलीला येऊन थांबली. बसमधून प्रवासी उतरताच त्याच्यावर 2 ते 4 चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्या प्रवासी जवळ असलेली बॅग हिसकावून या चौघांनी तिथून पोबारा केला.

बॅगेत 30 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा सर्व कट या व्यक्तीच्या निकटवर्तीयाकडून केल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासातून वर्तवला आहे. दरम्यान कामोठे पोलीस सदर घटनेचा सखोल तपास करत आहेत. या चोरांनी बॅग हिसकावण्यासाठी त्या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. यामुळे या हल्ल्यात ही व्यक्ती जखमी झाली आहे. या व्यक्तीवर उपचार केले जात आहेत.