रस्त्याच्या कडेला ऐटीत चालतंय वाघाचं जोडप (व्हिडिओ)

थंडीची चाहूल उशिराने लागली असली तरीही पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला हजेरी

Updated: Nov 13, 2019, 12:25 PM IST
रस्त्याच्या कडेला ऐटीत चालतंय वाघाचं जोडप (व्हिडिओ)  title=

मुंबई : चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी लोकप्रिय आहे. चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. या पर्यटकांना वाघाच्या जोडप्याचं सुंदर दर्शन झालं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

यंदा थंडीची चाहूल उशिराने लागली असली तरीही पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला हजेरी लावली आहे.  वन्यजीवही जणू त्याचा आनंद घेताना दिसत आहेत.  एक वाघ जोडपं जंगलातील रस्त्याने मनसोक्त भटकत असतानाचं दृश्य काही हौशी पर्यटकांनी आपल्या कॅमेरात चित्रीत केलं आहे. सध्या हा व्हीडीओ व्हायरल झाला असून, तो ताडोबा प्रकल्पाच्या मार्गावरचा असल्याची माहिती पुढे येत आहे. 

जून महिन्यात देखील प्रकल्पातील छोटी मधू वाघिणीचे आपल्या बछड्यांसह दर्शन झाले होते. आता हे बछडे मोठे झाले आहेत. दुर्मिळ मानले जाणाऱ्या छोटी मधुचे बछड्यांसह दर्शन झाले होते. वन्यजीव पर्यटक केयुज कडूकर यांनी याची दृश्ये टिपली असून ती सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली.

माया आणि बछडे, मटकासूर, छोटी तारा, लारा या वाघ वाघिणीनी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातील यंदाचा पर्यटन हंगाम गाजविला.