close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'टिक-टॉक'मध्ये हत्यारं दाखवणाऱ्याला पोलिसांकडून 'ठोक-ठाक'

पुण्यातील २३ वर्षीय युवकाने कोयत्यासारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडिओ तयार केला.   

Updated: May 15, 2019, 05:06 PM IST
'टिक-टॉक'मध्ये हत्यारं दाखवणाऱ्याला पोलिसांकडून 'ठोक-ठाक'

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : 'टिक टॉक'चे जाळे सर्वत्र पसरले आहे. अनेक तरूण मंडळी 'टिक टॉक'चा वापर आपले कौशल्य व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण पुण्यामध्ये 'टिक टॉक'चा गैरवापर होताना दिसत आहे. पुण्यातील २३ वर्षीय युवकाने कोयत्यासारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडिओ तयार केला. 

'वाढीव दिसताय राव' या लावणीच्या ठेक्यावर त्याने व्हिडिओ साकारला आहे. हा 'वाढीव' व्हिडिओ वाकड पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी या तरुणाला ठाण्यात आणून चांगलाच 'वाढीव प्रसाद' दिला. 

दीपक आबा दाखले, असे या युवकाचे नाव आहे. परिसरात आपली दहशत पसरवण्याच्या हेतूने व्हिडिओ तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सापाळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तसेच दीपकवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. दीपकवर यापूर्वी देखील मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.