व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी संदर्भात २०१९ पर्यंत वेळ हवा

२३ जून पासून लागू होणाऱ्या प्लास्टिक बंदी संदर्भात व्यापारी आक्रमक झाले आहेत.

Updated: Jun 22, 2018, 08:41 AM IST
व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी संदर्भात २०१९ पर्यंत वेळ हवा title=

मुंबई : २३ जून पासून लागू होणाऱ्या प्लास्टिक बंदी संदर्भात व्यापारी आक्रमक झाले आहेत. या प्लास्टिक बंदी ला त्यांनी विरोध केला आहे. 2019 पर्यंत व्यापाऱ्यांना वेळ देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. सध्या प्लास्टिक बंदी बद्दल सर्वांमध्ये संभ्रम आहे शिवाय प्लास्टिक बंदी ने व्यापाऱ्यांच ग्राहकांचा नुकसान होणार आहे असं देखील व्यापाऱ्यांच म्हणणं आहे मुंबई नवी मुंबई ठाणे इथल्या व्यापाऱ्यांची याच विषयी दादर इथे बैठक पार पडली.

मुख्यमंत्र्यांच आश्वासन 

यावेळी भाजपा आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच नुकसान होणार नाही अश्या पद्धतीने यातून मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती या बैठकीत व्यापाऱ्यांना दिली.