कोकण रेल्वे पुन्हा कोलमडली; बोगद्यात पाणी शिरले, 'या' 9 ट्रेन रद्द

Kokan Railway Train Update: मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वेच वेळापत्रक कोलमडले

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2024, 08:06 AM IST
कोकण रेल्वे पुन्हा कोलमडली; बोगद्यात पाणी शिरले, 'या' 9 ट्रेन रद्द title=
Trains On Konkan Railway Route Halted Due To Water Seepage In Tunnel day 2

Kokan Railway Update: कोकण व घाटमाध्यावर मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेची वाहतूकदेखील कोलमडली आहे. कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळं काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. (Kokan Railway Train Update)

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. मंगळवारी बोगद्यात पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तर कोकण रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत येथे काम सुरू होते. रात्री उशिराने पेडणे बोगद्यातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना करण्यात आली होती. तसंच, विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना करण्यात आल्या होत्या. मात्र, बुधवारी सकाळी पुन्हा एकदा बोगद्यात पाणी साचल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. 

कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 10जुलै 2024 रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ट्रेन्स चे मार्ग बदलण्यात येत आहेत. 

कोकण रेल्वे मार्गावरील या चार ट्रेन रद्द,तर एका ट्रेनचा मार्ग बदलला

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1) 22229 Csmt - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस

2) 12051 Csmt - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

3) 10103 Csmt - मडगाव मांडवी एक्सप्रेस

4) 12133 Csmt - बेंगलुरु एक्सप्रेस

5) 10104 मडगाव मुंबई - csmt मांडवी एक्सप्रेस 

6) 50108 मडगाव - सावंतवाडी रोड पॅसेंजर

7) 22120 मडगाव - csmt तेजस एक्सप्रेस

8) 12052 मडगाव - csmt जनशताब्दी एक्सप्रेस

9) 10106 सावंतवाडी - दिवा

वळवण्यात आलेल्या ट्रेन

1) 12518 निजामुद्दीन - एरणाकुलम ही गाडी पनवेल - लोणावळा - पुणे - मिरज या मार्गाने वळवण्यात आलेली आहे