जालन्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

पानशेंद्रामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.  

Updated: Sep 5, 2020, 07:24 AM IST
जालन्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू  title=
संग्रहित छाया

जालना :  पानशेंद्रामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. राहुल बोर्डे आणि प्रदीप बोर्डे अशी या दोघा मृत भावांची नावे आहेत. पोळ्याच्या दिवशी पानशेंद्रा गावातील दोन गटात हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पुन्हा याच दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यात राहुल बोर्डे जागीच ठार झाला, तर प्रदीप बोर्डेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली.

जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दोघा मृत महिलांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. फातेमा बी अब्दुल पिंजारी या ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेण्यात आला. अंत्यदर्शनासाठी मृतदेहाचा चेहरा उघडताच, तो एका हिंदू महिलेचा मृतदेह असल्याचं आढळलं. त्यामुळं गोदावरी रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

जुन्या वादातून जालन्यातील पानशेंद्रा येथे दोन गटात लाठ्या-काठ्याने मारहाण झाली. या हाणामारीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवशी देखील पानशेंद्रा गावात याच दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांविरोधात गुन्हे दाखल केले होते.दरम्यान आज पुन्हा याच दोन गटात हाणामारी झाली यात राहुल बोर्डे जागेवरच ठार झाला तर प्रदीप बोर्डे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक देखील केली.

रात्री उशिरापर्यंत मृतांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव निवाळण्याचा प्रयत्न केला.या वादानंतर पान शेंद्रा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली.

पोळ्याच्या दिवशी भांडण झालं होतं. त्यातून माझ्या मुलांना आज मारले. सगळ्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे, असे त्यांच्या आईने सांगितले.