close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विहीरीत पोहल्याने मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड, जामनेरमधील धक्कादायक प्रकार

 जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्यानं अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडलीय.

Updated: Jun 14, 2018, 06:36 PM IST
विहीरीत पोहल्याने मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड, जामनेरमधील धक्कादायक प्रकार

जामनेर : जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्यानं अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडलीय. जामनेर तालुक्यातल्या  वाकडी गावातल्या मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं ही अमानुष मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झालाय. मारहाण करणारा व्यक्ती त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून पट्ट्यानं जबर मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे ही दोघं मुलं कामाला असल्याचं सांगण्यात येतंय. लहूजी साळवे संघर्ष समितीनं या घटनेचा तीव्र निषेध करत अॅट्रोसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.  मात्र यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नसल्याचा दावा तालुक्यातल्या पहुर पोलिसांनी केलाय.