close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार

कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार 

Updated: Jul 19, 2019, 07:46 AM IST
कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवताळ : कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार तर दोन वेकोली कर्मचारी जखमी झाले आहेत. यवतमाळच्या वणी तालुक्यातील कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत सायंकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडली आहे. या खाणीत काम करणारे दोन वेकोली कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

कुंभारखणी येथे भूमिगत कोळसा खाण आहे. सन 2000 मध्ये ही खाण सुरू करण्यात आली होती. यातील कोळसा संपल्याने वेकोली प्रशासनाने मागच्या वर्षापासून ही खाण बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र खाण बंद होत असल्याने खाणीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. खाणीतील भंगारावर चोरट्यांची नजर असल्याने या खाणीतून लाखो रुपयांचे भंगारसुध्दा चोरीला गेले आहे. अशात आज खाणीतील गँस लीक झाल्याने राजकुमार सिंग आणि गुड्डू सिंग या दोघांचा येथे गुदमरून मृत्यू झाला, हे दोघेही बिहार राज्यातील रहिवासी आहेत.

कुंभारखणी वेकोली वसाहतीत राहणारे वेकोली कर्मचारी बंडू ठेंगणे आणि महादेव तेलंग हे दोघे खाण बंद करण्याचे काम करीत असताना गँस 
लीकची झळ त्यांनाही पोहचली त्यांना लगेच उपचाराकरिता वणी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आहे तर गुदमरून मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह खाणीच्या बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.