Raigad News: स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त राज्यातील विविध गडांना भेट देतात. शिवजयंतीनिमित्त आज अनेक शिवप्रेमी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले आहेत. मात्र, रायगडावर एक दुर्घटना थोडक्यात टळली आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले होते. अखेर या दोन तरुणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
शिवजयंती निमित्त आज लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर आले आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त आले आहेत. शिवजयंती निमित्त किल्ले रायगडावर गेलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले होते. तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करुन या दोघा तरुणांची सुटका करण्यास यश आले आहे.
रोपवेच्या मार्गावरुन जात असताना काही स्थानिकांनी या तरुणांना हिरकणी कड्यावर अडकलेले पाहिले. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाली. गडावर परत जाणे किंवा खाली उतरणे कठिण असल्याने एका दगडाचा आधार घेत दोघेही एकाठिकाणी जीव मुठीत घेऊन थांबले आहेत. हिरकणी कड्यावर अडकल्याने दोघा तरुणांनी रुमालाच्या इशाऱ्याने लोकांचे लक्ष वळवण्याचे प्रयत्न केले. तसंच आरडाओरडा करत सुटका करण्यासाठी साकडे घालत आहे. तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत या तरुणांच्या सुटकेसाठी दुसरा कोणतातरी पर्याय शोधण्यात येत होता.
दोघे तरुण शिवजंयतीसाठी रायगडावर आले होते. रोपवेच्या मार्गावरुन जाताना स्थानिकांनी दोघांना पाहिले त्यानंतर एकच गोंधळ उडाला. हिरकणी कड्याची वाट ही अत्यंत अवघड आणि किचकट आहे. अशा परिस्थितीत दोघेही तरुण एका दगडाचा आधार घेऊन एकाच ठिकाणी थांबले आहेत. तरुणांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. महाडमधील दोन टीम आहेत त्यातील एका टीमला बोलवण्यात आले होते. किल्ले रायगडाच्या हिरकणी कड्याच्या खालच्या बाजुस अडकलेल्या दोन शिवप्रेमींना सुखरूप खाली उतरवण्यात स्थानिकांना यश आले आहे.
सातारा येथील एक तरुण असून उत्तर प्रदेशातील एक असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने एकत्र होते. हे दोघे आज शिवजयंतीनिमित्त रायगड फिरण्यासाठी आले होते. हिरकणी बुरूज परिसरातून शॉर्टकटने खाली उतरण्याच्या नादात दोघेही रस्ता अडकले आणि तिथेच अडकून पडले. हिरकणी वाडीतील स्थानिक तरुणांनी बचावकार्य करत दोघांना सुखरुप खाली उतरवले आहे.