वैभववाडी ते कोल्हापूर... 'कोकण रेल्वे' पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार!

या मार्गाच्या उभारणीसाठी ५० टक्के खर्च भारतीय रेल्वे करेल तर  उर्वरित ५० टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे

Updated: Aug 1, 2018, 03:56 PM IST
वैभववाडी ते कोल्हापूर... 'कोकण रेल्वे' पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार! title=

मुंबई : कोकणी माणसांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारी कोकण रेल्वे आता लवकरच पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरच्या वैभववाडी ते कोल्हापूर अशी रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. ही घोषणा खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलीय. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वेच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.  

वैभववाडी ते कोल्हापूर असा १० स्थानकांसहीत १०३ किलोमीटर लांबीचा पल्ला असेल. या मार्गाच्या उभारणीसाठी ५० टक्के खर्च भारतीय रेल्वे करेल तर  उर्वरित ५० टक्के खर्च महाराष्ट्र राज्य शासन करणार आहे.