विधान परिषद निवडणूक : चंद्रपूर भाजपने राखले

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झालेत. 

Updated: May 24, 2018, 12:11 PM IST
 विधान परिषद निवडणूक : चंद्रपूर भाजपने राखले title=

चंद्रपूर : वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत रामदास आंबटकर हे भाजपचे उमेदवार विजयी झालेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांचा पराभव केला. काँग्रेस उमेदवाराला ४९३ मते तर भाजप उमेदवाराला ५२९ मते मिळालीत. तर नाशिकमध्ये शिवसेनेचे दराडे विजयी झालेत. तर परभणी-हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी बाजी मारली. तर दुसरीकडे अमरावतीत काँग्रेसला धक्का देत भाजपच्या प्रवीण पोटेंनी बाजी मारली.

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेत. परभणीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झालेत. तर नाशिकमध्येही शिवसेनेचे नरेंद्र दराडें विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. कोकणात सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय झालाय. त्यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव केलाय. तिकडे अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवलाय.