खेळणं काढताना कालव्यात पडून बुडाला चिमुकला

बॉबीचा मुतदेह पाहून आईने हंबरडा फोडला

Updated: Jan 4, 2022, 10:41 AM IST
खेळणं काढताना कालव्यात पडून बुडाला चिमुकला title=

नागपूर-नवीन कोराडी येथील बॉबी उर्फ अर्णव पंकज सोमकुवर 1 ताखेपासून बेपत्ता होता. 4 वर्षाच्या या चिमुकल्याचा शोध घेत असताना पोलिसांना त्याचा मृतदेह सुरादेवी कालव्याच्या पाण्यात आढळून आला .त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. सोमकुवर कुटुंबावर तर दुःखाचा पहाड कोसळला.
   बॉबी हा 1 जानेवारी रोजी 4 वाजताच्या सुमारास घराजवळून बेपत्ता झाला होता. बॉबी हा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करू शोध कार्य सुरू केले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केली असता तो घराजवळील परिसरातील कॅनलजवळ खेळतांना दिसून आला होता. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान एका लहानग्याला बॉबी  कालव्यात पडताना  दिसला होता.खेळणं उचण्यासाठी गेला असताना तो कालव्यात पडल्याचा संशय आहे.त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला.अखेर 3 जानेवारीला त्या परिसरापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या सुरादेवी येथे कालव्यात बॉबीचा मृत्यू देह तरंगताना दिसून आला.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे  बॉबी घराजवळ खेळत असताना त्याचे खेळणे कालव्यात पडले असावे.  ते काढण्याच्या प्रयत्नात बॉबीचा तोल जाऊन तो कालव्यात पडला.त्यानंतर  वाहत गेला असावा. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी बॉबीच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.