Cold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे

Updated: Nov 21, 2022, 10:59 AM IST
Cold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा  title=
Winter Cold wave in maharashtra imd weather forcast

Cold Wave in Maharashtra : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे. इतकी की, हिमाचल प्रदेशातील मनालीहून जास्त थंडी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये संध्याकाळपासून सकाळच्या वेळीसुद्धा थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच घसरणारा पारा पाहता पर्यटनप्रेमींनीही या ठिकाणांवर येण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. (Winter Cold wave in maharashtra imd weather forcast)

महाराष्ट्रातील सर्वात निचांकी तापमान कुठे? (Lowest temprature in maharashtra)

महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी (Nashik) नाशिकच्या ओझरमध्ये (Ozar) नोंदवण्यात आलं आहे. ओझरला सोमवारी (आज) 5.7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आलीये. तर, निफाडचा पारा 7 अंशावर आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या दिवसागणिक थंडीचा कहर वाढताना दिसत आहे. ही यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद असून, कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आला आहे. 

निफाडमध्ये सलग चौथ्या दिवशी थंडीचा कहर

गुलाबी थंडीचा अनुभव चालु हंगामात निफाड (Niphad) तालुक्यातील नागरिकांना जाणवू लागला आहे. कारण, सलग चौथ्या दिवशीही निफाडचा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली. 

गोंदिया जिल्ह्यातही असंच काहीसं चित्र (Gondia)

तिथे गोंदिया जिल्ह्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे.  पारा सातत्याने घसरत चालला असून जिल्हाचे किमान तापमान 10.4 अंशांपर्यंत खाली उतरलं आहे.  विदर्भात सर्वात थंड जिल्हात दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा आहे. पुढील आणखी काही दिवस अशीच बोचरी थंडी कायम राहणार, असा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात येतोय.  कोल्हापूर, सातारा, अमरावतीमध्येही परिस्थिती वेगळी नाही. 

मुंबईतही गारवा... (Mumbai Winter)

रविवारी राज्यात अनेक शहरांमध्ये तापमान 10 ते 15 अंशापर्यंत नोंदवण्यात आलं. मुंबईतही यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पारा 20 अंशाखाली घसरला. सांताक्रूझमध्ये 19 अंश इतकं तापमान  नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी असेल असंही सांगण्यात येतंय. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) बर्फवृष्टी होत असल्यामुळं तिथून वाहणाऱ्या शीतलहरींचे परिणाम देशभरात दिसू लागले आहेत. 

एकंदरच राज्यात असणारं वातावरण पाहता हिवाळी सहलींचे बेत आखण्यास अनेकांनीच सुरुवात केली आहे. आतातर निफाडचं तापमान पाहता, 8 अंशांवर असणाऱ्या मनालीला जाण्यापेक्षा काहींनी राज्यांतर्गत पर्यटनास प्राधान्यही दिलं आहे.