close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कल्याणमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप

छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप

Updated: Nov 8, 2019, 02:40 PM IST
कल्याणमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांचा चोप

कल्याण : कल्याणमध्ये अटाळी परिसरात १९ वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांनी चोप दिला आहे. ५५ वर्षीय धीरज राजपूत दररोजमुलीकडे शारीरिक सुखाची मागणी करायचा. मुलीनं याबाबत आईला सांगितलं. त्यानंतर महिलेनं धीरजला खांबाला बांधून चोप दिला. त्याची धींड काढली. धीरजला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. धीरजविरोधात ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

२ नोव्हेंबरला हा सगळा प्रकार घडला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.