मुंबईत राहतो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; 7.5 कोटींची संपत्ती, उच्चभ्रू भागात आहे आलिशान घर

World Richest Beggar: जगातील श्रीमंत भिकारी ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. पण हे खरंय मुंबईत जगातील सर्वात श्रीमंत भिकारी राहतो. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 7, 2023, 11:31 AM IST
मुंबईत राहतो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; 7.5 कोटींची संपत्ती, उच्चभ्रू भागात आहे आलिशान घर title=
Worlds Richest Mumbai Beggar Bharat Jain net worth of ₹75

Trending News In Marathi: भिकारी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर मळलेल्या कपड्यातील आणि अस्वच्छ अवतारातील व्यक्ती येतो. मात्र आम्ही तुम्हाला जगातील श्रीमंत भिकाऱ्याविषयी सांगणार आहोत. त्याचे रुप जरी अस्वच्छ आणि टापटीप नसेल तरी त्याच्याकडील संपत्ती पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. हा भिकाऱ्याचे नाव आहे भरत जैन मुंबईच्या अनेक रस्त्यांवर तो भीक  मागतात. 

आर्थिक परिस्थीती हलाखीची असल्यामुळं किंवा परिस्थितीमुळं शिक्षण न घेऊ शकल्यामुळं काही जणांवर भीक मागण्याची वेळ येते. मात्र, आता काही जणांनी भीक मागणे हा व्यवसाय म्हणून निवडला आहे. भरत जैन यांचे हे उदाहरण पाहून तुमच्या लक्षात येईल. मुंबईत दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठीही मेहनत घ्यावी लागते. मात्र, भरत जैन मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागून दिवसभरात हजारो रुपये मिळवतात. 

एका मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत राहणारे भरत जैन जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहेत. आर्थिक परिस्थीतीमुळं त्यांना शिक्षण घेणे शक्य झाले नाही म्हणून त्यांनी भीक मागून आपलं जगणं सुरु ठेवले. भरत यांचे लग्न झाले असून त्यांना 2 मुलं आहेत. भरत यांना त्यांच्या दोन्ही मुलांनी शिक्षण पूर्ण करावं, अशी इच्छा होती. त्यानुसार दोन्ही मुलांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. 

भरत जैन यांची एकूण संपत्ती 7.5 कोटी ($1 दशलक्ष) इतकी आहे. ते भीक मागून महिन्याला 60,000 ते 75,000 रुपये कमावतात. मीडिया रिपोर्टनुसार, भरत जैन यांच्याकडे मुंबईत 1.4 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट आहेत. तर, ठाण्यात त्यांनी दोन दुकाने खरेदी केली आहेत. यामुळं त्यांना महिन्याला 30,000 रुपये महिन्याला भाडे येते. भरत जैन मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनन्स आणि आझाद मैदानात भीक मागतात. 

श्रीमंत होऊन आणि पुरेसी संपत्ती गोळा करुनही भरत जैन अजूनही भीक मागतात. साधारण नोकरदार लोक 12-14 तास काम करुनही एका दिवसात हजार रुपये कमवू शकत नाही. मात्र भरत जैन याच लोकांच्या मेहेरबानीमुळं 10 ते 12 तासात 2000-2500 रुपये कमवतात. 

भरत जैन आणि त्यांचे कुटुंब परेलमध्ये 1बीएकचे डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतात. त्यांचे कुटुंबीय त्यांना वारंवार भीक न मागण्याचा सल्ला देतात. मात्र, तरीही ते कुटुंबीयांचे न ऐकता ते रोज भीक मागण्यासाठी जातात. भरत यांच्या कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात. तर, त्यांच्या मुलांचे शिक्षणही कॉन्वेंट शाळेत झाले आहे. भरत यांचे वडिल 80 लाखांच्या फ्लॅटमध्ये राहतात.