close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राहुल गांधींची सभा आटोपल्यानंतर सिलिंडर स्फोट

 एकता नगरमध्ये रस्त्यालगतच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट

Updated: Oct 16, 2019, 09:01 AM IST
राहुल गांधींची सभा आटोपल्यानंतर सिलिंडर स्फोट

श्रीकांत राऊत, झी मीडिया यवतमाळ : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची यवतमाळच्या वणी येथे जाहीर सभा आटोपल्यानंतर शहरात सिलेंडर स्फोट होऊन आग लागल्याने वणीत एकच खळबळ उडाली. सभा आटोपून राहुल गांधी ज्या मार्गावरून सभा आटोपून हेलीकॉप्टरकडे परतले त्याच मार्गावर एकता नगरमध्ये रस्त्यालगतच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला.

याठिकाणी झुणका भाकर केंद्र चालविल जाते. गॅस सिलेंडर बदलला जात असतानाच अचानक गॅस गळती होऊन सिलेंडर स्फोट झाला. आगीच्या ज्वालांनी दुकानाला कवेत घेतले. दरम्यान राहुल गांधींच्या वाहनांचा ताफा याच मार्गावरून गेल्याने त्याठिकाणी पोलीसांसह सर्व बंदोबस्त होता.

त्यामुळे लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनातून पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. आगीत दुकान खाक झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अचानक झालेल्या स्फोटाने वणीत खळबळ उडाली.