'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका

खासगी इंग्रजी शाळेंच्या (private English schools) मुजोरी विरोधात नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Nashik Municipal Education Department) जोरदार दणका दिला आहे.  

Updated: Jan 8, 2021, 01:38 PM IST
'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका  title=

योगेश खरे / नाशिक : खासगी इंग्रजी शाळेंच्या (private English schools) मुजोरी विरोधात नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Nashik Municipal Education Department) जोरदार दणका दिला आहे. 'झी 24 तास'ने शाळांची वाढती मुजोरी (School fees) यावर आवाज उठवला होता. रयान इंटरनॅशनल शाळेसह तीन खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात तक्रारीवर मनपाच्या शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु केली आहे.

शहरातील नामांकित असलेली रयान इंटरनॅशनल, होली फ्लॉवर आणि  केंब्रिज स्कूलची मान्यता रद्द करण्यासाठी मनपाच्या शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे पाठवला प्रस्ताव आहे. नाशिकच्या रयान इंटरनॅशनल शाळेच्या विरोधात नाशिक मनपाच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणीसह विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

गेल्या चार महिन्यांपासून याबाबत चौकशी सुरू होती. रयान इंटरनॅशनल शाळेत तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 'झी 24 तास'ने शाळांची वाढती मुजोरी यावर वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर नाशिक शहरात आता शिक्षण विभागाने कारवाईचे सत्र सुरू केलेय. शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीसाठी कुठलाही प्रतिसाद दिला जात नसल्याने शहरातील नामांकित रयान इंटरनॅशनल स्कूल सहतीन  इंग्रजी  माध्यमाच्या शाळांचीमान्यता रद्द करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे  शिफारस केली आहे.

इंग्रजी शाळेविषयी असलेल्या तक्रारी बघता उपनगर परिसरातील रयान इंटरनेशनल स्कूलसह होली फ्लॉवर आणि केंब्रिज इंटर नॅशनल स्कूलची चौकशी सुरू होती. याआधी त्रिस्तरीय समितीने एकूण सहा शाळांना नोटीस बजावत सहकार्य करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नाशिक शहरात पालक आणि शिक्षण विभाग विरुद्ध इंग्रजी शाळा असा सामना आता रंगणार आहे.