६ लाखाच्या टॉयलेटसाठी मोजले ८५ लाख रुपये

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टॉयलेट त्याला लागलेल्या बोलीमूळे चर्चेत आले आहे.

Updated: Dec 22, 2017, 09:50 AM IST
६ लाखाच्या टॉयलेटसाठी मोजले ८५ लाख रुपये  title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टॉयलेट त्याला लागलेल्या बोलीमूळे चर्चेत आले आहे.

टॉयलेट सफाईचे काम घेण्यासाठी साधारण ६ ते ८ लाख रुपये बोली लागते. पण सीएसटीएमच्या या टॉयलेटसाठी दसपट बोली लागली आहे. 

भाडे तत्वावर

 सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसारस मध्य रेल्वेचे हे टॉयलेट चालविण्यासाठी ८५ लाख रूपयांची बोली लागली.

या टॉयलेटला पहिल्यांदाच रिनॉवेट, ऑपरेट,मेंटेन आणि ट्रान्स्फर या योजनेअंतर्गत १० वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात येत आहे. यामध्ये ठेकेदार टॉयलेट रिनॉवेट करुन देखभाल करणार आहे.

घाणेरडे टॉयलेट

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात मुंबई रेल्वे स्थानकांतील बहुतांश टॉयलेट्स हे घाणेरडे असल्याचे समोर आले आहे.

'टॉयलेट'साठी एवढी मोठी बोली लागेल अशी आम्हालाही अपेक्षा नव्हती, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

रोज २.५ लाख प्रवासी

 भारतीय रेल्वे 'पे अॅण्ड यूज' स्कीम अंतर्गत लघुशंकेसाठी १ रुपया, शौचासाठी ५ रुपये आणि आंघोळीसाठी १५ रुपये घेतले जातात.  सीएसटीएमवर रोज २.५ लाख प्रवासी येतजात असतात. साधारण ६५ ते ७० हजार लोक शौचालयाचा वापर करतात. 

१८ लाखाची कमाई 

 हे शौचालय वातानूकुलित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यातून ठेकेदार महिन्याला १८ लाख रुपये कमावू शकतो.