मुंबईच्या रेडलाइट एरियातील मुलगी अमेरिकेसाठी प्रेरणा, आज २५ प्रभावशाली महिलांमध्ये समावेश

श्वेताने तिचे बालपण कामाठीपुरा येथील सेक्स वर्कर्समध्ये राहून घालवले. परंतु 

Updated: Jul 4, 2021, 04:58 PM IST
मुंबईच्या रेडलाइट एरियातील मुलगी अमेरिकेसाठी प्रेरणा, आज २५ प्रभावशाली महिलांमध्ये समावेश title=

मुंबई : मुंबईच्या रेडलाईट भागात कामठीपुरा येथे जन्म झालेल्या श्वेता कट्टीचीला अमेरिकेतील एक चांगल्या माहाविद्यालयात जाण्याची संधी आणि शिष्यवृती मिळाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र या मुलीचीच चर्चा सुरु आहे. या मुलीच्या य़शाबद्दल जरी सर्वांना माहित असले तरी, तिच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. श्वेता जन्म झालेला कामठीपुरा परिसर हा आशिया खंडातील एक प्रख्यात रेड लाइट क्षेत्र आहे. श्वेता ज्या परिसरातुन येते तेथील परिस्थिती ही अभ्यासासाठी अनुकूल नाही. परंतु तरीही तिच्या डोळ्यांनी स्वप्न पाहाने थांबवले नाही.

श्वेताने तिचे बालपण कामाठीपुरा येथील सेक्स वर्कर्समध्ये राहून घालवले. परंतु श्वेता (shweta kutti) सतत स्वत:ला अभ्यासासाठी प्रेरित करत असायची. कारण तिला माहित होते की, शिक्षणाच्या माध्यमातूनच ती या वातावरणातून बाहेर पडू शकेल. त्यामुळे तिला काहीही करुन येथून बाहेर पडायचे होते.

कामठीपुरा येथे राहणाऱ्या श्वेताचे कुटुंब तिच्या आईच्या उत्पन्नातून चालत होते. तिची आई दरमहा 5500 पगारावर एका कारखान्यात काम करत होती. तसे श्वेताचे वडील तर होते, परंतु ते सावत्र होते आणि त्यात ते दारुडे त्यामुळे घरात नेहमी ते सगळ्यांना मारहाण करायचे.

श्वेताच्या वडिलांच्या या स्वभावामुळे तिला कधीच चांगले वातावरण मिळाले नाही. श्वेतानेही तिच्या लहानपणी ज्या गोष्टींचा सामना केला होता, ती गोष्ट कोणत्याही स्त्रीसाठी भितीदायक आहे. तिच्या बालपणात ती तिनवेळा लैंगिक अत्याचाराचा बळी पडली होती.

वयाच्या नऊव्या वर्षी श्वेताला तिच्या एका जवळच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. श्वेताच्या रंगाबद्दल ही बऱ्याचदा तिची खिल्ली उडवली गेली. तिने सांगितले की, शाळेत तिला मुले शेण म्हणून हाक मारायची.

श्वेताला आयुष्यात बरेच काही करावे असे वाटत होते, परंतु तिला ना कसलीही मदत मिळाली, ना तिचा आत्मविश्वास वाढला. तिने आयुष्यात इतके सगळे सहन केले होते की, यामुळे ती स्वत:ला कमकुवत समजू लागली, ज्यामुळे तिला कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याची भीती वाटायची.

परंतु ते म्हणतात ना जिथे इच्छा असते, तेथे मार्ग ही सापडतोच. 16 वर्षीय श्वेता 2012 मध्ये क्रांती नावाच्या स्वयंसेवी संस्थेत सामील झाली तेव्हा तिला तिच्या लक्षाकडे जाण्याचा मार्ग सापडला. श्वेता ज्या परिस्थितीत मोठी झाली होती, त्या परिस्थितीमुळे तिला सगळ्यासाठी स्वत:चाच राग येऊ लागला होता. पण, या संस्थेने तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवले.

या संस्थेच्या मदतीने श्वेताने फक्त स्वत: लाच मजबूत बनवलं नाही, तर स्वत: सारख्या अन्य मुलींनाही तिने मजबूत बनवले. यानंतर श्वेताने कधीही मागे वळून पाहिले नाही. श्वेताला जेव्हा अमेरिकेतल्या दहा महागड्या महाविद्यालयांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बार्ड कॉलेजमध्ये शिकण्यासाठी 28 लाखांची  शिष्यवृत्ती मिळाली. या कॉलेजची चार वर्षांची पदवी फी सुमारे 30 लाख रुपये आहे.

खरेतर हे सगळं श्वेताच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे. ती सतत अमेरिकेतील विद्यापीठां विषयी इंटरनेट शोधत असायची. या दरम्यान तिची बार्ड कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. हा विद्यार्थी श्वेतावर इतका प्रभावित झाला की, त्याने श्वेताच्या नावाची शिफारस बार्ड कॉलेजला केली.

श्वेताच्या स्वप्नांची कहाणी कॉलेजच्या प्रवेश अधिकाऱ्यांच्या मनाला स्पर्श करुन गेली. त्यानंतर newsweek magazine ने ही त्यात तिला मदत केली. कारण या magazineमध्ये श्वेताची निवड 25 सर्वोत्कृष्ट महिलांमध्ये झाली होती. या कारणांमुळे बार्ड कॉलेजने श्वेताची शिष्यवृत्ती आनंदाने मंजूर केली.

खरेतर श्वेताच्या प्रशंसनीय प्रयत्नांमुळे newsweek या अमेरिकन magazine ने त्यांच्या 2013 च्या एप्रिलच्या अंकात 25 वर्षांखालील 25 महिलांच्या यादीत तिचा समावेश केला. यामध्ये त्या महिलांचा समावेश होत्या ज्या महिला या समाजासाठी प्रेरणा बनल्या आहेत. या यादीत पाकिस्तानच्या मलाला युसूफझई यांचेही नाव आहे.