Rutuja Latke : शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी केला 'हा' निर्धार

Rutuja Latke Maharashtra Political Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Vidhan Sabha By-election 2022) आता ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अर्ज भरणार आहेत.  

Updated: Oct 14, 2022, 11:06 AM IST
Rutuja Latke : शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी केला 'हा' निर्धार title=
Image Source : Rutuja Latke @ facebook Photo

Rutuja Latke Andheri Vidhan Sabha By-election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Vidhan Sabha By-election 2022) आता ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा मंजूर केला. राजीनामा स्विकरल्याचे पत्र हातात पडल्यानंतर त्यांनी ही पोटनिवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. आमच्यासोबत कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष सोबत आहेत. त्यामुळे आपण जिंकणार आहोत, असा दावा केला.

अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर 

ऋतुजा लटकेंचा राजीनामा अखेर मंजूर झाल्यानंतर आता त्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे पती रमेश लटके यांच्या निधनानंतर ही विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. मशाल या नव्या चिन्हावर ठाकरे गट निवडणूक लढवत आहे.

ऋतुजा लटकेंचा राजीनामा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल निर्देश दिल्यानंतर पालिका प्रशासनाने रात्रीतून राजीनामा स्विकारण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली. त्यानंतर सकाळी लटकेंनी महापालिकेत जाऊन राजीनाम्याची प्रत स्वीकारलीय. यामुळे लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून, थोड्याच वेळात त्या अर्ज भरणार आहेत. ऋतुजा लटकेंनी यावेळी बोलताना अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

आज लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लटके या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी ठागरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याची तयारीही झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुंबईत मशाल चिन्ह पोहोचविण्यासाठी ठाकरे गट घरोघरी पोहोचणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.