Anil Deshmukh Bail : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

Mumbai High Court ने सीबीआयची याचिका फेटाळली, Anil Deshmukh यांची उद्याच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता

Updated: Dec 28, 2022, 11:15 AM IST
Anil Deshmukh Bail : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा title=

Anil Deshmukh Granted Bail : आताची सर्वात मोठी बातमी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.  मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) सीबीआयची (CBI) याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन (Bail) मंजूर केला होता. पण त्याविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपली. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने सीबीआयला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. 

जामिनाला सीबीआयने घेतला होता आक्षेप
मनी लॉड्रिंग प्रकरणी  (Money Laundering) अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्या जामिनावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) आक्षेप घेतला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने  याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जामीन देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. 

अनिल देशमुख  Anil Deshmukh) यांना न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाच्या आदेशाला दिलेली स्थगितीची मुदत 22 डिसेंबर रोजी संपत होती. त्यामुळे स्थगितीच्या निर्णयाला 3 जानेवारी 2023पर्यंत मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी सीबीआयने (CBI)  मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एक खंडपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केल्याने त्यांच्यासमोरच मंगळवारी सीबीआयने प्रकरण सादर केलं. तसंच देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगितीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. 

अनिल देशमुखांच्या घराबाहेर जल्लोष

अनिल देशमुख यांची उद्या सुटका होणार असल्यामुळे त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्ये अनिल देखमुख यांच्या नागपूरातील घराबाहेर जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करता कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केलीय.

काय होतं प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने तपास सुरु केला आणि त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर चौकशीअंती अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाली. आता तब्बल 1 वर्षांने अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x