वर्षा संजय राऊत यांना ईडीकडून आणखी एक समन्स

 ५ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

Updated: Dec 29, 2020, 08:47 PM IST
वर्षा संजय राऊत यांना ईडीकडून आणखी एक समन्स

मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने आणखी एक समन्स पाठवला असून ५ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात प्रविण राऊत आणि त्यांच्या पत्नीचे म्हणणे ईडीने ऐकले असून केवळ वर्षा राऊत यांचे स्टेटमेंट बाकी आहे.

आज वर्षा राऊत यांनी ईडीला पत्र लिहून आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती. पण ईडीने आता त्यांना ५ जानेवारील हजर राहण्यास सांगितलं आहे.

वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटीशीवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. या नोटीशीमागे राजकारण असलं तरी सरकारी कागदपत्रांचा आम्ही आदर करतो असं राऊत म्हणाले होते. 

संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या आशिष शेलारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. संजय राऊत बिथरलेत, घाबरलेत. त्यामुळं जनता आणि शिवसेनाही त्यांना गांभिर्यानं घेत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

ईडीच्या नोटिसीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून विरोधकांवर टीका केली होती.