मुंबई मनपाच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी बंद पडलेल्या या ३५ शाळा खासगी संस्थांना दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातल्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Updated: Jul 11, 2017, 10:48 AM IST
मुंबई मनपाच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी बंद पडलेल्या या ३५ शाळा खासगी संस्थांना दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातल्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना महापालिकाच २७ शालेय वस्तू देणार आहे. तसंच मुख्याध्यापकही महापालिकेच्या शाळेचाच असणार आहे. शिक्षक मात्र खासगी संस्थांचे असतील अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिली आहे.