Big News: आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी ग्रुपच करणार

तीन बड्या कंपन्या होत्या धारावीच्या पुनर्विकासाच्या टेंडरच्या शर्यतीत होत्या. अदानी समुहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तिघा बड्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. डीएलएफ ग्रुपने 2,025 कोटींची बोली लावली. नमन ग्रुप तांत्रिक बाबतीत अपात्र ठरल्यानं स्पर्धेतून बाद झाला. अखेर अदानी ग्रुपने 5,069 कोटी रुपयांची बोली लावून कंत्राट मिळवले.

Updated: Nov 29, 2022, 06:46 PM IST
Big News: आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी ग्रुपच करणार   title=

Dharavi Redevelopment Project : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी भागाच्या पुनर्विकासासाठी ( Mumbai Dharavi Redevelop Project )  अदानी ग्रुपच करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. धारावी पुनर्विकासाच्या कामाचे कंत्राट अदानी ग्रुपला मिळाले आहे. टेंडर प्रक्रियेत अदानी ग्रुपने 5,069 कोटी रुपयांची बोली लावून हे कंत्राट मिळवले आहे.  मागील अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकास रखडला आहे. शिंदे-फडणवीस सरकार(Shinde-Fadnavis government) अस्तित्वात येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला(dharavi redevelopment plan) गती मिळाली. यानंतर पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. 

तीन बड्या कंपन्या होत्या धारावीच्या पुनर्विकासाच्या शर्यतीत 

तीन बड्या कंपन्या होत्या धारावीच्या पुनर्विकासाच्या टेंडरच्या शर्यतीत होत्या. अदानी समुहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तिघा बड्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. डीएलएफ ग्रुपने 2,025 कोटींची बोली लावली. नमन ग्रुप तांत्रिक बाबतीत अपात्र ठरल्यानं स्पर्धेतून बाद झाला. अखेर अदानी ग्रुपने 5,069 कोटी रुपयांची बोली लावून कंत्राट मिळवले.

23 हजार कोटींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प 

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा तब्बल 23 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. 600 एकरावर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं कंत्राट कुणाला मिळणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागल होते. दक्षिण कोरिया आणि UAE मधील कंपन्यांदेखील धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक होत्या.