NCB आणि अधिकाऱ्यांविरोधात मोठे षडयंत्र; मोहित कंभोज यांचा खळबळजनक आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवीन घटनाक्रम समोर येत आहेत. आज भाजप नेते मोहित कंभोज यांनी याप्रकरणी धक्कादायक आरोप केले आहेत

Updated: Nov 6, 2021, 01:10 PM IST
NCB आणि अधिकाऱ्यांविरोधात मोठे षडयंत्र; मोहित कंभोज यांचा खळबळजनक आरोप title=

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नवीन घटनाक्रम समोर येत आहेत. आज भाजप नेते मोहित कंभोज यांनी याप्रकरणी धक्कादायक आरोप केले आहेत. कुंभोज यांनी ड्रग्ज प्रकरणी एनसीबीला लक्ष करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे षडयंत्र असल्याचे म्हटले. तसेच या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनिल पाटील असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी लावला आहे.

सुनिल पाटील या प्रकरणाचा मास्टरमाइंड
आर्यनला अटक झाली काही दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला. या सर्व गोष्टींचा मास्टर माईंड सुनिल पाटील असून तो राष्ट्रवादीचा माणूस आहे. सुनिल 20 वर्षापासून या पक्षाशी संबंधित आहे. 
पाटील हा अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांचा हा  यांचा जवळचा मित्र आहे.  आर्यन खान प्रकरणी किरण गोसावी कसा भाजपचा, समिर वानखेडेंचा माणूस आहे. तो कसा आर्यनला ओढत नेत होता. असे भासवण्याचा प्रयत्न केला गेला. असा आरोप कंभोज यांनी केला आहे.

अनेक मंत्र्यांशी संबधी
सुनिल पाटील यांचे महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांशी संबध आहेत. सॅम डिसूजा याचा उल्लेख नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी केला. सुनिलने सॅमला फोन करून सांगितले की, मला नार्कोटीक्समधल्या अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे. त्याने वी वी सिंग या अधिकाऱ्याशी बोलणे करून दिले.
२ तारखेला राष्ट्रवादीच्या सुनिल पाटीलने सांगितले की माझ्या एका माणसाला तुमच्या टीममध्ये घ्या तो सगळे पुढचे सांगेल. तो व्यक्ती म्हणजेच किरण गोसावी होय! असेही कंभोज यांनी म्हटले

किरण गोसावी सुनिल पाटीलचा मित्र 
किरण गोसावी सुनील पाटील चा मित्र असून तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढणे भेटणे हे यांचे काम होय. राज्यात बड्या अधिकाऱ्यांचे बदलीचे रॅकेट सुनील पाटील चालवतो.
कॅबिनेट मंत्री जे आरोप करत आहेत त्यांना नेमकं कोणाला वाचवायचे आहे ?  असा सवालही कंभोज यांनी उपस्थित केला.

ललित हॉटेलवर सुनिल पाटीलसोबत बैठका
सुनील पाटील हा ललित हॉटेलमध्ये राहत होता. राष्ट्रवादीचे मंत्री इथे असायचे. ऋषिकेश देशमुख या ललित हॉटेलमध्ये एक वर्ष होते. त्यामुळे ड्रग पेडलरला महाराष्ट्रात संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. अशीही टीका त्यांनी केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चिंकू पठाणसोबत बैठका
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक चिंकू पठाणला एनसीबीने अटक केली. Maw maw चा हा मोठा डीलर आहे. कोरोना काळात सह्याद्रीवर चिंकू पठाणला महाराष्ट्राचे गृहमंत्री भेटले त्यावेळी सुनील पाटील ही तिथेच होता तसेच एका मंत्र्यांचा जावई ही तिथे होता. पठाणला वाचवण्यासाठी पैसे किती यावर चर्चा झाली. असा धक्कादायक आरोपही कुंभोज यांनी विचारला.

एनसीबीविरोधात मोठे षडयंत्र
नवाब मलिक आणि सुनील पाटील यांचे काय संबंध आहेत याचा खुलासा त्यांनी करावा. ललित हॉटेल मध्ये नवाब मलिक काय करत होते. किरण गोसावीने आर्यन सोबत फोटो काढला तो सुनील पाटील ला पाठवला. त्याने तो पुढे सर्वांना पाठवला. 
एन सी बी अधिकारी आणि agency विरोधात मोठ्या षडयंत्राचा हा भाग होता.  पण गोसावी अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असून त्याच्या फोन कॉल्स चा तापसी व्हावी. सुनील पाटील धुळ्याचे रहिवासी असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहेत. अशीही माहिती कुंभोज यांनी पत्रकार परिषदेत दिली.